अंबा-अंबिका लेणी

भारतपीडिया कडून
2409:4042:4c00:16f0::f748:be09 (चर्चा)द्वारा ११:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

अंबा-अंबिका लेणी ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असलेली लेणी आहे. इ.स.पू. पहिल्या शतकात ही लेणी निर्माण केलेल्या आहेत. यात बौद्ध विहार, चैत्यगृह, पाण्याची कुंडे यासारखी ३३ खोदकामे दिसून येतात.

स्वरूप

या लेणीत जैन क्षेत्रपाल, जैन देवी चक्रेश्वरी कोरलेली आढळते. जैनांचे प्रथम तीर्थकर, बावीसावे तीर्थकर नेमिनाथ आणि जैन देवता अंबिकेची मूर्ती येथे आहे. यातील अंबिका आंब्याच्या झाडाखाली बसलेली दाखवली आहे. या देवीवरूनच या गटाला 'अंबा-अंबिका' असे नाव मिळाले आहे. या लेणी दिगंबर जैन धर्मा संबंधित आहेत, आणि त्यांचे जतन व देखभाल दिगंबर जैन परंपरेनुसार करण्यात यावी

शिलालेख

शिलालेख वाचनातून या डोंगराचे मूळ नाव ‘मानमुकुड’ (संस्कृत- ‘मानमुकुट’) असावे हे लक्षात येते.

हेही पहा

साचा:विस्तार साचा:महाराष्ट्रातील लेणी साचा:भारतीय बौद्ध लेणी