ओम

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search
Om symbol.svg

साचा:हिंदू धर्म-लेख ओम (ॐ) हे हिन्दु धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. ओंकार हा 'अ'कार,'उ'कार व 'म'कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे.

उत्पत्ती

याज्ञवल्क्य ऋषींच्या वक्तव्यावरून,ब्रह्मदेवाने पूूर्ण ब्रम्हाण्डचे दोहन केल्यावर ऋग्,यजु व साम हे तीन वेद उत्पन्न झाले. या वेदांमध्ये संपूर्ण ब्रम्हांडाचा अंश आहे. या वेदांमधील प्रत्येक ऋचा ही अनेक ऋषींनी उच्चारली आणि त्यातून अनुक्रमे 'अ' ,'उ' आणि 'म्' हे वर्ण उगम पावले . हे वर्ण सम्पूर्ण ब्रम्हाण्डात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा,विष्णूमहेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.

उच्चार आणि धार्मिक समज

गणेशाची ओंकार स्वरूपातील एक मूर्ती

ओंकारातील अ या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात. त्याने सृष्टीचा निर्माता ब्रह्मा याचे स्मरण होते. उ या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चम्बू होतो. त्या चम्बूच्या गोलाकार स्वरूपाने सृष्टीचा पालनहार अशा विष्णूचे स्मरण होते व सृष्टीच्या चक्राचा प्रारम्भ होतो. म् उच्चारतांना ओठ बन्द होतात. हे सृष्टीच्या लयाचे प्रतीक आहे.त्याने सृष्टिसंहारक शिवाचे स्मरण होते. अ हा स्वर सर्वांत कोमल स्वर आहे, तसेच तो ओम्-कारातील आद्य स्वर आहे. त्यामुळे, 'अ' हा स्वर उच्चारल्यास आपणास मूलध्वनीचा आभास होतो. उ हा मुखोत्पन्न (केवळ मुखातून निघालेला) सर्वाधिक तीव्र स्वर आहे. अर्थात, ती तीव्र शक्ती आहे. अशी शक्ती आपणास संकटाच्या वेळी योग्य तो निर्णय घेऊन देवी-देवतांची शक्ती जागृत करणाऱ्या विष्णूचे स्मरण करवून शरीराला ऊर्जा प्रदान करते. म् हे प्राथमिक अनुनासिक असून ते उच्चारले असता त्याआधील ध्वनीचा लोप होतो व वातावरण पुनः शान्त होते. हा उच्चार आपणास परमतत्त्व शिवाचा आभास घडवतो. अशाप्रकारे, ओम्-कार हे परमतत्त्व प्रदर्शक चिन्ह आहे असे हिन्दूधर्मात सांगितले आहे.

मंत्रस्वरूप

भगवान पतंजलीनी ओंकारासाठी प्रणव हा शब्द योजिला आहे. प्रणव म्हणजे भगवन्तासाठी उच्चारलेला स्तुतिपर शब्द. ओम हा तीन अक्षरांचा लघु मंत्रच आहे. याचा जप केल्याने जगाच्या सर्व दिव्य शक्तींचे स्मरण होते.

इतर अर्थ

छांदोग्य उपनिषदात ओंकाराचा अर्थ 'अनुज्ञा' म्हणजेच स्वीकृती असा केला गेला आहे. जो ओंकाराचा स्वीकार करणे समजतो तो समृद्ध होतो.

पाणिनी मुनींनी ओंकाराचे अठरा अर्थ विदित केले आहेत. रक्षक, संचालक, द्युतिमान, प्रिय ......इत्यादी.

गुरुमुखी लिपीतला ओंकार

गुरू नानक यांनी 'इक ओंकार सतनाम' (ओंकार हेच खरे सत्य असे नाव आहे)अशी त्याची व्याख्या केली आहे.

सर्व वेद या पदाची घोषणा करतात, सर्व तपे ज्याच्याविषयी बोलतात , ज्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्याचे आचरण करतात ते पद ओम आहे असे म्हटले आहे.*

संदर्भ

  • कठोपनिषद १.२