कण्व घराणे

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

कण्व घराणे (इ.स.पू. ७३ ते इ.स.पू. २८) याची स्थापना वसुदेव याने इ.स.पू. ७३ मध्ये केली होती.

इतिहास

शुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभूती हा केवळ नावाचा राजा होता. सर्व कारभार त्याचा मुख्य प्रधान वसुदेव याच्याच हातात होता. या वसुदेवानेच देवभूतीला ठार करून मगधाचे राज्य बळकावले व तेथून पुढे मगधावरील शुंगांची सत्ता जाऊन तेथे कण्व घराण्याची सत्ता चालू झाली.

राजे

वसुदेव धरून कण्व घराण्यात एकूण चार राजे झाले. १. वासुदेव २. भुमीमित्र ३. नारायण ४. सुसामन (सुशर्मा)

कामगिरी

या चारही राजांनी मिळून फक्त पंचेचाळीस वर्षे राज्य केले.

शेवट

इ.स.पू. २८ मध्ये या घराण्यातील शेवटचा राजा सुशर्मा याला सातवाहन घराण्यातील एका राजाने ठार मारून मगधावर आपली सत्ता प्रस्थापित करून कण्व घराण्याचा शेवट केला.

साचा:भारतीय राजवंश