कुरु महाजनपद
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:५७, १ मे २०२२चे आवर्तन
कुरु महाजनपद हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश
पंजाब-दिल्लीच्या परिसरात यमुनेच्या तीरावर हे राज्य होते. हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ या याच्या राजधान्या होत्या.
राजे
ऐल-पौरवंशाची सत्ता कुरू या राज्यावर होती.
अस्त
कौरव-पांडवातील महाभारतीय युद्धामुळे या राज्याचे सामर्थ्य संपुष्टात आले. दुर्बल झालेले हे कुरू राज्य नंतर मगधाने जिंकून घेतले. साचा:महाजनपदे साचा:विस्तार