गणेशलेणी

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:५५, २७ जून २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

अजिंठा लेण्यांच्या डोंगरापाठीमागे असलेल्या डोंगररांगेत काही हजार वर्षापूर्वीची गणेशलेणी आहेत. सोयगावपासून दक्षिण दिशेला पाच किलोमीटर अंतरावर, गलवाडा-वेताळवाडी मार्गाने गणेशलेणीच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्यापासून पाचशे मीटर अंतर डोंगरावर चढून गेल्यानंतर थोड्या उतारानंतर खोल दरीवजा परिसरात गणेशलेणी आहेत. रुद्रेश्वर मंदिर म्हणूनही या स्थळाची ओळख आहे. गणेशलेणीत प्रवेश करताच प्रसन्न मुद्रेतील गणेशमूर्ती दिसते तर समोर सभामंडप आहे. मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मूर्तीची उंची पाच फूट तर रुंदी तितकीच असावी. मूर्तीच्या पाठीमागे भुयारी मार्ग असून तो मार्ग अजिठा लेणीपर्यंत जातो असे स्थानिक सांगतात. गणेशमूर्तीच्या बाजूस दगडी बैठकीवर महादेवाचे शिवलिंग आहे आणि नंदीही आहे, त्यास रुद्रेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिरातच गणेशमूर्ती शेजारी कोरलेल्या दगडात नृसिंहाची मूर्ती व, सप्तमातृक शिल्पे दिसतात. शेजारीच प्रचंड असा पाण्याचा धबधबा कोसळत असतो.

गणेशलेणीतील-गणेशमूर्ती