बोर्डी नदी

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट नदी

बोर्डी नदी ही महाराष्ट्रातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांतून वाहणारी एक नदी आहे.

’’श्रीक्षेत्र नागझिरा” नावाचे एक रेल्वे स्टेशन मुंबई - कलकत्ता लोहमार्गावर मुंबईपासून ५५५ किलोमीटरवर आहे. त्या नागझिरा गावात एक नागेश्वराचे प्राचीन देऊळ आहे. देवळाच्या आसपासच्या प्रदेशातून पाण्याचे अनेक झरे उगम पावतात. त्यांतल्या काही झऱ्यांच्या मीलनातून, देवळापासून जेमेतेम दीड किलोमीटरच्या अंतरावर मोहना नदी तयार होते, आणि पूर्वेकडे वाहत राहते.

मोहना नदीला वाटेत अनेक झरे मिळतात.त्याशिवाय रामकुंड, गोपाळकुंड आणि गोरखकुंड या तीन कुंडांतून ओसंडणारे पाणी मोहनेत मिसळते. मोहना नदी पुढे बोर्डी नदीला मिळते. बोर्डी नदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. गोरखकुंडात जमिनीतून येणारे पाणी हे पूर्णा नदीचे असते, अशी समजूत आहे.

  • ठाणे जिल्ह्यात बोर्डी नावाच्या गावाला लागून असणारी चौपाटी ही त्या जिल्ह्यातल्या दुसऱ्याच एका बोर्डी नावाच्या नदीमुळे झाली आहे.

हे सुद्धा पहा

साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख साचा:भारतातील नद्या