सईबाई भोसले

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहास लेखन साचा:माहितीचौकट व्यक्ती सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३६ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छ्त्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.

सईबाईंचे या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती.साचा:संदर्भ हवा सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला.साचा:संदर्भ हवा


साचा:मराठा साम्राज्य