अग्निष्वात्त

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार

अग्निष्वात्त हा सप्तपितरांपैकी एक दैवी पितरसमूह आहे. मनोनिग्रह करून वैराग्याने राहणारे हे पितर कश्यपाशी संबंधित असल्याचे उल्लेख पौराणिक साहित्यात आढळतात. महाभारतातील सभापर्वानुसार हे पितर कश्यपाची संतती होते, तर अन्य काही पौराणिक संदर्भांनुसार हे पितर कश्यपाचे भाऊ होते (स्रोत हवा).
हे पितर ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले असा निर्देश कालिकापुराणातील एका आख्यायिकेत आहे. ब्रह्मदेव आपली मानसकन्या संध्या हिच्यावर मोहित झाला. तेव्हा त्याच्या घामापासून ६४,००० अग्निष्वात्त पितृगणांची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका आहे.
दक्षकन्या स्वधा ही त्यांची पत्नी होती असा उल्लेख भागवत पुराणात सापडतो. त्यांची अच्छोदा नामक एक मानसकन्या होती.
या पितृगणांचे वास्तव्य वैभ्राज लोकात ('विरजस्‌' लोकात) असे. दैत्य, यक्ष, राक्षस लोक त्यांची उपासना करीत.