आनंद भाटे

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट गायक

आनंद भाटे (इ.स. १९७१; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायक आहेत.

पार्श्वभूमी

आनंद यांचा जन्म इ.स. १९७१ मध्ये पुण्याच्या भाटे कुटुंबात झाला. त्यांच्या घरात आधीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचे पणजोबा भाटेबुवा हे ठुमरी गायनातील व नाट्यसंगीतातील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, तिच्याद्वारे त्यांनी अनेक संगीत नाटके बसविली होती. आनंद यांची संगीताची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालगंधर्वांचे ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे त्यांना संगीत शिक्षण घेण्यास पाठवले. यशवंत मराठे यांच्याकडेही त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे गिरवले. आनंद यांनी इ.स. १९८१ म्हणजेच वयाच्या दहाव्या वर्षी आपला पहिला गाण्याचा कार्यक्रम केला. पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे आनंद भाटे हे १५ वर्षे संगीत शिकले.

एक लहान मुलगा बालगंधर्वाची नाट्यगीते हुबेहूब गातो हे पाहून लोक आनंद भाटे यांना आनंद गंधर्व म्हणू लागले.

कारकीर्द

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्याच एका कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी यांनी आनंद यांना ‘आनंद गंधर्व’ ही पदवी दिली. आणि मग पुढे कार्यक्रमालाही तेच नाव देण्यात आले. सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी आपले गायन सादर केले आहे. बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांनी अनेक गाणी गायिली असून त्यातील अनेक गीतांना पुरस्कार मिळाले आहेत. पंडित भीमसेन जोशी आणि बालगंधर्व हे त्यांचे आदर्श आहेत. जुन्या मैफलींची क्षणचित्रे, त्यांच्याकडचे अंदाजे १०० वर्षे जुने असलेले उस्ताद अब्दुल करीम खॉंसाहेबांचे तानपुरे आहेत. नवीन पिढीतल्या कोणत्या शिष्यांकडून अपेक्षा आहेत या प्रश्नाला पंडित भीमसेन जोशी यांनी "आनंद भाटे", असे दूरदर्शनवरील एका मुलाखतीत सांगितले होते.

वैयक्तिक

आनंद भाटे हे एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत अधिकारी पदावर काम करतात. आपली नोकरी सांभाळून ते गायन करतात.

पुरस्कार

  • मिफ्टा(Marathi International Film and Theatre Awards)चा पुरस्कार सोहळ्यात - सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार - चित्रपट (बालगंधर्व)
  • आनंद भाटे यांना "आनंद गंधर्व" अशी अनौपचारिक उपाधी देण्यात आली आहे.
  • स्वरानंद प्रतिष्ठान या संस्थेचा २०११ सालचा माणिक वर्मा पुरस्कार


साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक

बाह्य दुवे