कोरीगड - कोराईगड

भारतपीडिया कडून
49.32.109.75 (चर्चा)द्वारा २०:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

कोरीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

साचा:किल्ला

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.

इतिहास

११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली.

छायाचित्रे

गडावरील ठिकाणे

कोराई देवीचे मंदिर
गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.

गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.

गणेश टाके
गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मूर्ती आहे.थोडे वर चढाई केल्यास प्रवेश द्वाराला नवीन लाकडी दरवाजा लावला आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात.

लोण्यावळ्यापासून २५ कि. मी. वर शहापूरला खाजगी वाहनाने जाता येते.

संदर्भ

बाह्य दुवे

नकाशा : http://wikimapia.org/#lat=18.619243&lon=73.385904&z=14&l=0&m=a&v=2

साचा:महाराष्ट्रातील किल्ले

साचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)