द्विपुष्कर योग

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:बदल द्विपुष्कर आणि त्रिपुष्कर योग :-

भद्रा तिथीच्या दिवशी, म्हणजेच द्वितीया, सप्तमी वा दशमी या तिथीच्या दिवशी जर रविवार, मंगळवार किंवा शनिवार आला की चंद्रनक्षत्रानुसार द्विपुष्कर किंवा त्रिपुष्कर योग होतो.[१]

धनिष्ठा, चित्रा किंवा मृग नक्षत्रात चंद्र असेल तर द्विपुष्कर योग आणि कृतिका, पुनर्वसु, विशाखा, उतराफाल्गुनी, उत्तराषाढ़ा वा उत्तराभाद्रपद नक्षत्रात असेल तर त्रिपुष्कर योग होतो.

द्विपुष्कर योगामध्ये ज्या शुभ कार्याची सुरुवात होते त्याची पुनरावृत्ती होते. हा योग चालू असताना ज्या शुभाशुभ घटनेची समाप्ती होते ती कालान्तराने दुप्पट होते, असे शास्त्र सांगते. म्हणून या काळात धन-संपत्तीविषयक शुभ काम करावे, श्राद्धादी अशुभ कार्य करू नये.[२]

द्विपुष्कर किंवा किंवा त्रिपुष्कर योग चालू असताना मृताची अंत्येष्टी करू नये, असे सांगितले जाते.

संदर्भ

साचा:संदर्भयादी