नांदेड

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:१४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.[१]

नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब (पहा हुजूर साहिब नांदेड) आहे. काही वर्षांपूर्वी २००८ येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा गुरुग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पण्डित आणि वामन पण्डित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यीक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णूपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड सह १६ तालुके आहेत त्यांची नावे पुढीप्रमाणेनाव = मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर, व नांदेड.

भौगोलिक स्थान

महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोलीयवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत.

वाहतूक व्यवस्था

पारंपारिक वाहतूक

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेड साठी महाराष्ट्र राज्य परिवहन मण्डळाची थेट बससेवा उपलब्ध आहे.

===रेल्वे=== नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे हुजूर साहेब नान्देड रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागात आहे आणि दिल्ली,मुम्बई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, बंगळूर, चेन्नई, चंदीगड, जयपूर, बनारस, अलाहाबाद, विशाखापट्टणम, श्री गंगानगर, ओरिसा, हावडा, तिरुपती, कोल्हापूर, पटना, नागपूर येथून नान्देडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते.

===हवाई=== नांदेड येथे श्री गुरू गोविंदसिंग जी विमानतळ आहे. नांदेड हे हवाई मार्गाने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अमृतसर आणि तिरुपती या शहरांशी जोडले गेले आहे. खाजगी विमान कंपन्यांपैकी ट्रुजेट आणि एअर इंडिया या कंपन्यांच्या विमानांनी नान्देडला जाता येते.

स्थानिक वाहतूक

स्थानिक लोक सायकल रिक्षाचा व शेअर रिक्षाचा उपयोग करतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात रिक्षा नान्देडमध्ये आहेत.

संस्कृती

या शहरात प्रामुख्याने हिंदू,मुस्लिम आणि महत्त्वाची म्हणजे शीख धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथील गोदावरी नदीच्या किनारी नंदी या महादेवाच्या वाहनाने नृत्य केले म्हणून या शहरास नांदेड असे नाव पडले आणि याच्या मुळेच इथे हिंदू संस्कृती अस्तित्वात आली. शीख धर्मियांच्या दहावे गुरू गोविंदसिंग यांचे समाधी स्थळ इथेच आहे ते म्हणजे सचखंड गुरुद्वारा यांच्यामुळेच इथे शीख संस्कृती वसली आहे.

भाषा

नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी भाषा आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तसेच तेलंगाणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे येथे काही नागरिक तेलुगू, कन्नडदखनी उर्दू भाषेत सुद्धा बोलतात. गोरमाटी भाषा अनेक वस्ती, तांड्यावर बोलली जाते इथे गोर बंजारा समाज पण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आढळून येते.नांदेड येथे पंजाबी भाषा पण मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते.

परंपरा

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा , महाविहार बाबरी नगर दाभड येथे भरणारी महाधम्म परिषद, बाराड चैत्र पौर्णिमा यात्रा,हुजुर साहिब नांदेड दसरा हल्लाबोल महहला,भगवान बालाजी दसरा रथयात्रा नांदेड,दाभाड सत्य गणपती, कंधार येथील हजिसाया उरूस, माहूर येथील नारळी पौर्णिमा निमित्त भरणारी परिक्रमा यात्रा तसेच नवरात्र महोत्सव, दत्तशिखर माहूर येथील दत्त जयंती सोहळा, सोनखेड येथील जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा बिजोत्सव सप्ताह, हिन्दूशीख समुदायाचा दसरा हे वार्षिक सोहळे अत्यन्त छान असतात. रावण दहन, दीपावली, सन्दल, रमजान ईद, बकरी ईद, ईद ए मिलाद, शिवजयन्ती,डॉ. बाबासाहेब आम्बेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयन्ती, बुद्ध पौर्णिमा, गणेश उत्सव हे दिवसही उत्साहाने साजरे होतात.

माध्यमे

स्थानिक वृत्तपत्रे

नान्देड येथून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे -

  • दैनिक गोदातीर समाचार
  • दैनिक प्रजावाणी
  • दैनिक भूमिपुत्र
  • दैनिक लोकपत्र
  • दै.उद्याचा मराठवाडा
  • दैनिक सत्यप्रभा

इलेक्ट्रॉनिक मीडिया

उद्याचा मराठवाडा, गोदातीर समाचार, प्रजावाणी, लोकमत, लोकसत्ता, सकाळ ही मराठी वृत्तपत्रे आणि इण्डियन एक्सप्रेसटाइम्स ऑफ इण्डिया या इंग्रजी वृत्तपत्रांचा नान्देडमध्ये अधिक खप आहे.साचा:संदर्भ हवा. साप्ताहिक मराठी स्वराज्य हे मराठी साप्ताहिक वृत्तपत्रही लोकप्रिय आहे. नान्देडमध्ये आकाशवाणी, रेडियो सिटी ही रेडियो केन्द्रे ऐकता येतात. झी मराठी, ई-टीव्ही मराठी, आयबी एन लोकमत, मी मराठी, साम मराठी आणि दूरदर्शनची सह्यादी या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेतसाचा:संदर्भ हवा. अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील दूरचित्रवाणीवर दिसतात. अनेक संस्था अन्तरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात; परंतु त्यांतल्या त्यांत बीएस्‌एन्‌एल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कम्पन्या आहेतसाचा:संदर्भ हवा.

शैक्षणिक

नान्देड हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. नान्देडला महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक परीक्षा विभागाची शाखा आहे.

विद्यापीठ

इ.स. १९९४ साली नान्देड विद्यापीठाची (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची) स्थापना झाली. सुमारे ३८९ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.व तसेच यशवन्तराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे विभागिय केन्द्र नान्देड येथे आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालये

वैद्यकीय महाविद्यालये

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी
  • शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
  • श्यामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालय

पारंपारिक महाविद्यालये

सैनिकी प्रशिक्षण संस्था

  • राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय सगरोळी ता. बिलोली येथे आहे. प्राचार्य अरविंद देशमुख यांनी या सैनिकी शाळेसाठी आयुष्य वेचले. मुदखेड येथे केंद्रीय राखीव पोलीस बलाचे केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय आहे.

प्राथमिक शिक्षण संस्था

  • केंब्रिज विद्यालय
  • प्रतिभा निकेतन
  • पीपल्स हायस्कूल
  • म. फुले विद्यालय
  • शाहू विद्यालय इंदिरा पब्लिक स्कूल नरसिंह विद्या मंदिर शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिजामाता प्राथमिक शाळा राणी लक्ष्मीबाई विद्यालय गोदावरी इंटर नॅशनल स्कूल. सरस्वती हायस्कूल सांदिपानी पब्लिक स्कूल. नागसेन विद्यालय प्रभातनगर इंदिरा गांधी हायस्कूल हडको नांदेड. नागार्जुना इंटरनॅशनल स्कूल कौथा नांदेड

राजकारण

नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकीय स्तरावर माहीत असलेले मोठे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी पदे भूषविली. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण हे चालवत आहेत. त्यांनी मुख्यमत्र्यांच्या दोन कालावधीत हे पद ग्रहण केले आहे. महाराष्ट्रातील पिता-पुत्रांची ही एकमेव जोडी आहे. तसेच माजी खासदार व आमदार भाई डॉ. केशवराव धोंडगे हे सुद्धा मातब्बर नेते आहेत.त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.आणि मा.खा.सूर्यकांता पाटील यांनी सुद्धा देशाच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ग्रामविकास राज्य मंत्री म्हणून नांदेडचे नाव उज्ज्वल केले

भाग

अबचलनगर

शिवाजीनगर

श्रीनगर

चौफाळा

चैतन्य नगर

विष्णूनगर

भाग्यनगर

राहुलनगर

राहुल नगर महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील नांदेड वाघाळा महानगरपालिका वसलेले नगरचा भाग आहे. नांदेड-वाघाळा महानगर पालिकेतील शेवटचे टोक महानगर पालिका अंतर्गत नगराचा विकास झाला आहे राहुल नगरच्या बाजूला नांदेड मधील M.I.D.C एरिया असुन लोकचा मुख्यता कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:महाराष्ट्रातील जिल्हे