Jump to content

शृंगी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हिंदू पौराणिक कथा आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या कथेनुसार, शृंगी हा ऋषी शमीकचा पुत्र होता. शमीकऋषींच्या गळ्यात साप टाकून अर्जुनाचा पुत्र परीक्षितराजाने ऋषी शमीकांची अवहेलना केली. हे समजल्यावर शृंगी याने परीक्षितराजाला शाप दिला की त्याचा मृत्यू सातव्या दिवशी तक्षक नावाच्या नागाच्या दंशामुळे होईल व तसेच झाले.