Jump to content

टाकळी ढोकेश्वर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

टाकळी ढोकेश्वर हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुकातील गाव आहे. या गावाहून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो.

ढोकेश्वर मंदिर[संपादन | स्रोत संपादित करा]

या गावाजवळ ढोकेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे. गावाच्या मंदिराकडे जाण्यासाठी वाकडी वळणदार वाट आहे. हे मंदिर डोंगरात कोरलेले आहे. या ठिकाणी गोड पाण्याचे टाके आहे. यामंदिरावरून या गावाला टाकळी ढोकेश्वर असे नाव पडले आहे. मंदिरात महादेवाची खूप मोठी आकर्षक पिंड आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात तीसऱ्या सोमवारी व शिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

जवाहर नवोदय विद्यालय[संपादन | स्रोत संपादित करा]

जवाहर नवोदय विद्यालय हे मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे चालवले जाते. येथील विद्यालय इ.स. १९८८साली सुरू झाले. विद्यालय गावच्या पश्चिमेला आहे.

अहमदनगर