Jump to content

पंतसचिव चिमणाजी रघुनाथ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३९, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पंतसचिव चिमणाजी रघुनाथ हे भोर संस्थानाचे इ.स. १८३७ ते १८७१ ह्या कालावधीत राज्यकर्ते होते. हे रघुनाथ चिमणाजी यांचे दत्तक पुत्र होते.

साताऱ्याचे मांडलिक असलेल्या भोर संस्थानाने चिमणाजींच्या राज्याभिषेकानंतर वार्षिक ९,००० रुपयांची खंडणी सुरू ठेवली. पंतसचिवांना १५ घोडेस्वार (प्रत्येकी २५ रुपये मासिक पगार अधिकतम), ११२ अरब आणि इतर मिश्र जातींचे तलवारबाज आणि बरकंदाज (प्रत्येकी ५-१५ रुपये मासिक पगार), २०० शेत सनदी (शेतजमिनीच्या बदल्यात लढणारे हंगामी सैनिक) आणि १,२२५ शेत सनदी किल्लेकरी (किल्ल्यांची राखण करणारे शेत सनदी) इतकी शिबंदी राखण्यास मुभा होती.[]

साचा:विस्तार

साचा:संदर्भनोंदी