Jump to content

वासुदेव हरी चाफेकर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

वासुदेव हरी चाफेकर (इ.स. १८८० - ८ मे, इ.स. १८९९) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या भारतीय क्रांतिकारकांचे बंधू होत.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

वासुदेवांचा जन्म इ.स. १८८० मध्ये पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या त्यांच्या बंधूंसह सहभाग घेतला. भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. वॉल्टर चार्ल्स रँडच्या पुण्यातील वाईट वागणुकीबद्दल त्याच्या वधाचा कट रचला. त्यांना अटक करून खटला चालविण्यात आला. ८ मे इ.स. १८९९ मध्ये येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आली.

साचा:विस्तार