Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
जगत शेठ - मराठीपिडिया Jump to content

जगत शेठ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट चित्र:House Of Jagat Seth Complex - Mahimapur - Murshidabad 2017-03-28 6165-6169.tif जगत शेठ हे नवाब सिराजउद्दोलाच्या काळात मुर्शीदाबाद, बंगाल मधील सावकार होते. जैन आचार्य भ्रातृचंद्र सुरी‌ हे त्यांचे अाध्यात्मिक गुरू होते. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात शेठ हे भारतातील सर्वात शक्तिशाली सावकार होते. ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार राॅबिन ओर्मी यांनी‌ जगत शेठचे वर्णन 'जगाला माहीत असलेल्या महान सावकाराच्या रुपात' केले आहे.[] 

निक रॉबिन्स याच्या मते त्यांच्याशी स्पर्धा करू शकेल असे निदान भारतात तरी कोणीही‌ नव्हते. शेठने व त्याच्या कुटुंबानेे ब्रिटिश साम्राज्याशी त्यांच्याच चलनात/नाण्यांमध्ये सावकारी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. त्यावेळच्या फ़्रेंच अभ्यासकांच्या मते त्याने गोळा केलेल्या संपत्तीमुळेच खरेतर पुढच्या बदलांना चालना मिळाली. ओमीचंद आणि मीर जाफ़र यांच्याबरोबरीनेच त्याने नवाबाविरुद्ध कारस्थान रचले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्लासीच्या लढाईसाठीची आर्थिक मदत जगत शेठने दिली होती. आणि त्या मदतीच्या जोरावर ब्रिटिशांनी भारतात त्यांचे स्थान बळकट केले. मीर जाफरच्या नंतर सत्तेत आलेल्या मीर कासीमने जगत शेठ आणि त्याच्या कुटुंबाचे १७६३ साली शिरकाण केले. [][]

संदर्भ यादी[संपादन | स्रोत संपादित करा]