Jump to content

राग मालकंस

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:राग

राग मालकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ची आहे. हा काही वेळा मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत याच सारखा हिंदोलम हा राग असू शकतो. मालकंस तीन ही सप्तकात विस्तारक्षम असा हा राग आहे. या रागात सर्व स्वर कोमल असले तरी राग स्वरूप हे शुद्ध आहे कुठल्याही रागाची छाया यावर नाही. गंभीर प्रकृतीचा राग आहे.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

हा सर्वात पुरातन रागांपैकी एक राग आहे. संगीतकार नौशाद यांच्यासह एक वर्ग असे मानतो की या रागाची रचना भगवान शिव यांनी केली आहे. तर काही लोक मानतात की याची रचना पार्वतीने केली. शिव तांडव करत असताना बेभान झाले असता त्यांना शांत करण्यासाठी हा मालकंस राग पार्वतीने गायला.

स्वरूप[संपादन | स्रोत संपादित करा]

आरोह:नी सा ग' म ध' नि' सां

अवरोह: सां नि' ध' म ग' म ग' सा अथवा सां नि' ध' म ग' सा पकड : गमधss गम गसाssनी ग सा

वादी व संवादी[संपादन | स्रोत संपादित करा]

वादी स्वर मध्यम (म) आणि संवादी स्वर षड्ज (सा)

लक्षणगीत[संपादन | स्रोत संपादित करा]

मालकंस गावत गुनिजन रि प वर्जित सूर गधनी कोमल अत गंभीर रस सोहत सुंदर || अंतरा || वादी मध्यम जनको संमत संवादी सूर षड्जही मानत वेळा रजनी मध्य सुहावत

मालकंस रागातील काही गीते[संपादन | स्रोत संपादित करा]




साचा:विस्तार

साचा:हिंदुस्तानी संगीत