Jump to content

सईदुद्दीन डागर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:५५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सईदुद्दीन डागर (जन्म : इ.स. १९३९; - ३१ जुलै २०१७) हे धृपद गाणाऱ्या डागर घराण्याचे १९वे वंशज होते. त्यांचे वास्तव्य पुणे शहरात असे. त्यांचे चिरंजीव नफीसुद्दीन आणि अनीसुद्दीन हेही धृपद गायक आहेत.

सईदुद्दीन डागर यांना मिळालेले पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • पुणे महापालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कार (२६ जून २०१६)
  • पुण्याच्या गानवर्धन संस्थेतर्फे गायिका सुहासिनी कोरटकर यांनी पुरस्कृत केलेला पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या नावाचा ’संगीतभूषण पुरस्कार’. (२७-२-२०१६)
  • पी.एन. गाडगीळ सराफ यांच्याकडून ‘रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ पुरस्कार’ (जानेवारी २०१७)