यशवंतगड (रेडी)
साचा:माहितीचौकट किल्ला यशवंतगड (रेडी) हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान आणि किल्ल्याची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]
यशवंतगड (रेडी) किल्ला हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे. या गडाची जागा खाडीच्या मुखावर असलेल्या टेकडीवर आहे. गडाला मजबूत तटबंदी असून बुरुजही बांधलेले आहेत. तटदरवाज्यातून प्रवेश केल्यावर बालेकिल्याकडे जाणारी पाखाडी लागते. तेथून पुढे एक तटबंदी पार केल्यावर बालेकिल्ला लागतो. बालेकिल्ल्याला २५ फुट उंचीचा तट आहे. तटावर बाहेरून चढायला अवघड जावे यासाठी आग्नेय दिशा सोडून सर्व बाजूंनी खंदक खणलेले आहेत. किल्ल्यात पडक्या वाड्याचे अवशेष राहिले आहेत. या वाड्याला अनेक झाडांनी वेढलेले आहे. पण पाण्याचा साठा कुठेच सापडत नाही.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
या किल्ल्याचा इतिहास सध्या माहित नाही.
छायाचित्रे[संपादन | स्रोत संपादित करा]
-
यशवंतगड (रेडी) किल्ल्याला जोडलेला समुद्र किनारा
-
यशवंतगड (रेडी) मधील वाड्यांचे अवशेष
-
यशवंतगड (रेडी) मधील वाड्यांची सद्यस्थिती
-
यशवंतगड (रेडी) मधील वाड्यांची सद्यस्थिती
-
यशवंतगड (रेडी) जवळील सापडलेला ६ फुट उंचीचा बसलेला गणपती
कसे जाल[संपादन | स्रोत संपादित करा]
वेन्गुर्ल्यामार्गे शिरोडा बोटीतून ओलांडून रेडीमध्ये पोहोचले की हा किल्ला आहे.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन | स्रोत संपादित करा]
पडके वाडे आणि भक्कम तटबंदी
गडावरील राहायची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
नाही
गडावरील खाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
नाही
गडावरील पाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]
नाही
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर