Jump to content

तेरेसा (निकोबारमधील बेट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट साचा:हा लेख तेरेसा हे भारताच्या निकोबार द्वीपसमूहातील २२ बेटांमधील एक बेट आहे.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

जेव्हा ऑस्ट्रिया (इ.स. १७७८-१७८४) आणि डेन्मार्क (इ.स. १७५४-१८६८) या देशांनी तेरेसा आपलीच वसाहत आहे असा दावा केला, त्यावेळी त्यांनी बेटाला ऑस्ट्रियन आर्च-डचेस (रोमन साम्राज्यातील आर्चड्यूक या शासकाच्या घराण्यातील राजकन्या) मारिया थेरेसियाचे नाव दिले. तेरेसा बेटाची इ.स. २००४ साली आलेल्या त्सुनामीत फार हानी झाली.

भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]

तेरेसा हे निकोबारमधील कामोत्रा बेटाच्या पश्चिमेला आणि काटचाई बेटाच्या वायव्येला आहे. तेरेसाच्या पूर्वेला चूरा आणि बाॅमपोका ही दोन लहान बेटे आहेत. तेरेसा बेटाचे क्षेत्रफळ १०१ चौरस किलोमीटर आहे.. बेताच्या उत्तरी टोकाची समुद्रसपाटीपासूनची उंची ८७ मीटर आहे.

लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]

तेरेसाची लोकसंख्या २०११ साली १,९३४ इतकी होती. पैकी बंगालीभाषक ३५४, कालसी जातीचे ३३५ आणि मिनयुक जातीचे लोक ३०५ होती.

शासन[संपादन | स्रोत संपादित करा]

नानकौरी शहराचा हिस्सा असलेले तेरेसा हे तेरेसा तालुक्यात येते.

चौपाटी[संपादन | स्रोत संपादित करा]

तेरेसा बेटाच्या पूर्वेला सफद वाळूची चौपाटी आहे.