ज.वि. पवार
Appearance
जयराम विठ्ठल पवार (जन्म : १४ जुलै १९४३), ज. वि. पवार म्हणून प्रसिद्ध, हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.[१][२][३][४][५][६][७][८]
कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]
- आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते
- 'दलित पॅंथर' आणि 'सम्यक क्रांती' या संघटनांचे प्रवर्तक
- चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखन
- 'विद्रोही' आणि 'धम्मलिपी' नियतकालिकांचे संपादन
- 'प्रबुद्ध भारत'चे कार्यकारी संपादक.
- नामांतर, रिडल्स, एनरॉन, आरक्षण आदी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग
- इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे अध्यक्ष.
लेखन (सत्तावीस पुस्तके प्रकाशित)[संपादन | स्रोत संपादित करा]
- दलित पैंथर्स : ॲन ऑथोरिटेटिव्ह हिस्ट्री (मूळ इंग्रजी; हिंदी अनुवादक - अशोक झा)
- नाकेबंदी (कवितासंग्रह) : इंग्रजी भाषांतर Blockade; अनुवादक प्रा. व्ही.डी. चंदनशिवे.