शंतनू कांबळे
Appearance
शंतनू कांबळे हे एक विद्रोही कवी आणि लोकशाहीर होते. १३ जून २०१८ रोजी त्यांचे नाशिक येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ३९ वर्षाचे होते.[१][२] 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बनवण्यात आला आहे. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. नक्षलवादी चळवळींशी सबंध असल्याच्या संशयावरून त्यांना नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक झाली होती, मात्र नंतर निर्दोष सुटकाही झाली.