Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
वज्रपाणी - मराठीपिडिया Jump to content

वज्रपाणी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट वज्रपाणी एक बोधिसत्व आहेत. ध्यानी बुद्ध अक्षोभ्य आणि मामकी देवी यांचा आध्यात्मिक पुत्र. वज्र हे याचे प्रतीक असून, नीलकमल हे अभिज्ञानचिन्ह आहे.

हा नीलवर्ण आहे. याच्या प्रतिमा उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत असून, त्याच्या हाती वज्रसहित कमल असते. केव्हा केव्हा तो एका हातात छातीजवळ वज्र धरतो.

सुजाता ही याची शक्ती असून, ॐ वज्रपाणि हुम् हा याचा मंत्र आहे. जेव्हा बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी नाग आले, तेव्हा बुद्धाने वज्रपाणीला गरुडापासून त्यांचे रक्षण करण्याची आज्ञा दिली, अशी कथा आहे. याने असुरांशी युद्ध करण्यासाठी अनेक उग्र रूपे धारण केली होती.

वज्रपाणिलोकेश्वर या नावाने याचे आणखी एक वेगळे रूप आढळते, ते असे- हा एकमुख व द्विभुज असून, कमळावर उभा असतो. तो आपल्या उजव्या हातात वज्र घेऊन ते मस्तकावर धरतो व डावा हात बेंबीजवळ धरतो. तो अर्धपर्यंक नृत्यावस्थेत आहे.

या बोधिसत्वाच्या बऱ्याच मूर्ती तिबेटचीन या देशांत आढळल्या आहेत. साचा:Sfn []

कलादालन[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भसूची

संदर्भसूची[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:स्रोत पुस्तक