Jump to content

तोडा समाज

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox ethnic group तोडा समाज हा एक तामिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतरांगावर उंच पहाडावर राहणारा मागास समाज आहे. तोडा समाजाची बोलीभाषा तोडा भाषा आहे. तोडा भाषा ही कन्नड भाषेशी संबंधित द्रविड भाषासमूहातील एक प्राचीन बोलीभाषा आहे.[]

तोडा समाज प्रामुख्याने कुंनूर आणि उदगमंडलम (उटी) तालुक्यात मोठ्या प्रमाणात रहातो. इ.स. २००१ च्या जनगणने नुसार तोडा समाजाची लोकसंख्या २२०० पर्यंत आहे. हा समाज गोलसर आकाराच्या झोपड्यात रहातो. झोपड्यांच्या समूहास माड असे म्हणतात. या समाजाचा मुख्य व्यवसाय हा म्हशीपालनाचा आहे. तोडा समाजात कधीकाळी बहुभार्तृत्व आणि बहुपत्नीत्व या दोन्ही रूढी होत्या. विशेष करून बहुभार्तृत्व म्हणजे एखाद्या महिलेचा जेव्हा एका पुरुषाशी विवाह होतो तेव्हा ती त्याच्या इतर भावांची पण पत्नी होते.[][][][]

चित्र दालन[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी