Jump to content

बाबा हरदेव सिंह

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बाबा हरदेव सिंग (२३ फेब्रुवारी, इ.स. १९५४ : दिल्ली, भारत - १३ मे, इ.स. २०१६ : मॉंत्रियाल, कॅनडा) हे शीख आध्यात्मिक गुरू होते. १९७१ मध्ये त्यांनी निरंकारी सेवादलामध्ये प्राथमिक सदस्य म्हणून प्रवेश केला आणि १९७५ मध्ये त्यांनी निरंकारी यूथ फोरमची स्थापना केली.

२४ एप्रिल १९८० रोजी दहशतवाद्यांनी निरंकारी मिशनचे तत्कालीन प्रमुख सद्गुरू बाबा गुरूबचन सिंह आणि हरदेव सिंग यांच्या वडिलांची हत्या केली. २७ एप्रिल १९८० रोजी बाबा हरदेव सिंह यांना मिशनचे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व स्थापन करण्यासाठी बाबा हरदेव सिंह यांनी देश-विदेशांमध्ये विस्तृत प्रचार यात्रा आयोजित केल्या.

शांती, संयम आणि औदार्य अशा त्रिगुणांच्या अनोख्या संगमामुळे बाबा हरदेव सिंह यांनी लाखो अनुयायी जोडले आणि मानवतेची पूजा करणारा निरंकारी पंथ जगभर पसरवला.

कॅनडाच्या कल्याण यात्रेवर असताना, १३ मे, २०१६ रोजी, गाडी अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.