केशवचैतन्य
Appearance
केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य) हे संत तुकारामांचे गुरू मानले जातात. त्यांची समाधी ओतूर येथे असून त्यांचा समाधिकाल सन १५७१ असावा.समाधी स्थानाच्या शेजारी 'मांडवी' नदीचा प्रवाह वाहतो.
गुरुपरंपरा[संपादन | स्रोत संपादित करा]
- वेदव्यास
- राघवचैतन्य
- केशवचैतन्य
तुकारामांना केशवचैतन्यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले नाही, तर स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. याला प्रमाण म्हणून तुकारामांचा खालील अभंग सांगितला जातो.
सदगुरूराये कृपा केली मज । परी नाही घडली सेवा काही ॥धृ॥
सापडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥१॥
भोजना मागती तूप पावशेर । पडला विसर स्वप्नामाजी ॥२॥
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥३॥
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्णहरी ॥४॥
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥५॥