Jump to content

अमिताव घोष

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख

अमिताव घोष हे भारतीय रिझर्व बँकेचे १६ वे गव्हर्नर होते. गव्हर्नर म्हणून त्यांचा कार्यकाळ अवघ्या २० दिवसांचा होता. सगळ्यात कमी कालावधीचे गव्हर्नर म्हणून अमिताव घोष ओळखले जातात. अमिताव घोष हे आधी रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. तर त्या आधी त्यांनी अलाहबाद बँकेचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे आणि ते आय.डी.बी.आय. बँकेच्या संचालकांपैकी एक होते. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजेमेन्ट या संस्थेच्या मंडळावरही होते.

अमिताव घोष यांना रु. २/- (दोन सिरिज), रु. ५/- आणि रु. १०/- या नोटांवर भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून आपली सही करता आली. ए. घोष अशी छोटी स्वाक्षरी असलेल्या अमिताव घोष यांच्या नोटा छंद म्हणून जमा कराणाऱ्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात.

साचा:क्रम

हेसुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार