Jump to content

शुभं करोति

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते ||१||

दिव्या दिव्या दिपत्कार, कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्याला पाहून नमस्कार |
दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी |
माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी ||२||

तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळे मध्यान्हात |
घरातली ईडापीडा बाहेर जावो |
बाहेरची लक्ष्मी घरात येवो |
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ||३||

दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ||४||

अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति |
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ |
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णूरुपिण: |
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ||५||