Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
खंडेनवमी - मराठीपिडिया Jump to content

खंडेनवमी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:३३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
फुलबाजार झेंडूची फुले

खंडेनवमी हा दिवस आश्विन शुक्ल नवमीला साजरा केला जातो.[]हिंदू धर्म - परंपरेत या दिवशी शस्त्रपूजन केले जाते.[] हा विजयादशमीच्या आधीचा दिवस असतो.[]

लढाऊ जमातीचा उत्सव[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतातील लढवय्या जमातीचा हा विशेष सण भारतभरात साजरा केला जातो. राजस्थानात खड्गपूजेचा विशेष महोत्सव साजरा केला जाई.नवरात्रीच्या काळात या शस्त्रांची मिरवणूक काढली जात असे.[]

संस्थानिक घराण्यात[संपादन | स्रोत संपादित करा]

संस्थानिक घराण्यात या दिवशी नवरात्रीनिमित्त देवीला कोहळ्याचा बळी दिला जातो. पशुबली पद्धती बंद झाल्यानंतर कोहळ्याचा बळी देण्याची प्रथा सुरू झालेली दिसते.[]

ग्रामीण संस्कृतीत[संपादन | स्रोत संपादित करा]

खंडे नवमीच्या दिवशी गावातील शेतकरी हे शेतीची अवजारे स्वच्छ करून त्यांची पूजा करतात. या दिवशी शिल्पकार आणि कारागीर आपआपल्या पारंपरिक कौशल्याच्या अवजारांची पूजा करतात..[]

महाराष्ट्रातील लोकदैवत श्री ज्योतिबा (कोल्हापूर) याचा पालखीसोहळा खंडेनवमीच्या दिवशी साजरा होतो.[]

आदिवासी प्रांतांत[संपादन | स्रोत संपादित करा]

नवरात्री आणि त्यानिमित्त होणारे उत्सव आदिवासीबहुल प्रांतात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरे होतात. नवरात्रीनिमित्त जय्रा भरतात. पोतराज हे या प्रांतांत विशेष आकर्षण असते. पशुबळी देतात आणि पशूच्या रक्ताने देवीला अभिषेक करतात. खंडेनवमीच्या दिवशी या जत्रेची सांगता होते.[]

व्यावसायिक क्षेत्रांत[संपादन | स्रोत संपादित करा]

आधुनिक काळात गावोगावच्या मोठ्या कारखान्यांमध्ये खंडेनवमीच्या दिवशी कारखाना स्वच्छ करतात. यंत्रांची आणि अवजारांची पूजा होते. रांगोळी काढून, झेंडूची फुले सजवून या दिवसाचा उत्साह वाढविला जातो.[]

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

विजयादशमी

शारदीय नवरात्र

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]