छट पूजा
Appearance
साचा:विकिडेटा माहितीचौकट छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो.हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. भारताच्या बिहार व झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते.[१]
या व्रतादरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.संपूर्ण वर्षात चैत्र मासात व कार्तिक मासात अशी दोन वेळा छट पूजा करण्यात येते. पण कार्तिक महिन्यातील छट पूजेचे महत्त्व जास्त असते.[२]