Jump to content

दिल्ली दरबार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दिल्ली दरबार: इंग्लंडच्यामधील राजाच्या किंवा राणीच्या राज्यारोहणाच्या निमित्ताने ब्रिटिशकालीन भारतात दिल्लीत समारंभपूर्वक झालेल्या भव्य सामाजिक एकत्रीकरणांचे नाव दिल्ली दरबार आहे. यालाच इंपीरियल दरबार या नावानेही ओळखले जाते. भारतात ब्रिटिश साम्राज्य ऐन भरात असताना तीन वेळा १८७७, १९०३ आणि १९११ मध्ये दिल्ली दबाभार भरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष सिंहासनारूढ राजे मात्र एकदाच म्हणजे १९११मध्ये, पंचम जॉर्ज, या दरबारात उपस्थित राहिले होते.

मोंगल राज्यपद्धतीतील दरबार शब्दावरून दिल्ली दरबार हा शब्द रूढ झाला. स्वतंत्र भारताच्या लोकशाही व्यवस्थेतही दिल्लीत एकवटलेल्या राजकीय सत्तेचा उल्लेख करताना साहित्य आणि माध्यमांमधून उपरोधिकपणे ही संज्ञा वापरली गेल्याचे दिसून येते.