Jump to content

जिव्या सोमा म्हसे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट जिव्या सोमा मशे(जन्म : १९ मे इ.स.१९३४; - १५ मे इ.स.२०१८) हे एक मराठी चित्रकार व कलाकार होते. त्यांनी वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले ते पहिले आदिवासी कलावंत आहेत.[] वारली जमातीत प्रामुख्याने महिलांची कला म्हणून ओळखला जाणारा हा कलाप्रकार म्हसे यांनी वयाच्या तेराव्या वर्षी आत्मसात केला.[]

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

पालघर भागातील आदिवासींचे वास्तव्य असलेल्या डहाणू तालुक्यातील गंजाड या गावात त्यांचे वास्तव्य होते.

योगदान[संपादन | स्रोत संपादित करा]

कलात्मक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कलाकारांना संधी मिळावी या उद्देशाने भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोहीम सुरू केली. या मोहिमेत भास्कर कुलकर्णी यांची जिव्या सोमा म्हसे यांच्याशी ओळख झाली, आणि म्हसे यांच्या निमित्ताने वारली चित्रकला समाजासमोर आली.

पारंपरिक वारली चित्रांमध्ये म्हसे यांनी प्राणी, पक्षी, सूर्य, चंद्र, फूल, फळ अशा निसर्गचित्रांना स्थान मिळवून दिले, हे त्यांचे योगदान म्हणून सांगता येईल.[]

पद्मश्री पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
म्हसे यांनी काढलेले वारली चित्र

वारली चित्रकलेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल भारत सरकारने त्यांना इ.स. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.[] इ.स.१९७६ साली म्हसे यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अन्य सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतासह जर्मनी, रशिया, जपान, इटली, इंग्लंड, चीन, बेल्जियम या देशांमध्ये म्हसे यांनी आपली कला सादर केली आहे. बेल्जियमच्या राणीने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. जपानमधील मिथिला म्युझियमचे संचालक होसेगवा यांच्या हस्तेही म्हसे यांचा गौरव करण्यात आला आहे.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी४. https://www.loksatta.com/lekha-news/artist-jivya-soma-mashe-1682967/[]