Jump to content

भारतीय आगमन दिन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भारतीय आगमन दिन हा कॅरिबियन बेटांमध्ये तसेच मॉरिशसमधील सुट्टीचा दिवस आहे. भारतातून वेठबिगारी मजूर या प्रदेशांत आल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.

गयाना[संपादन | स्रोत संपादित करा]

गयानामध्ये ५ मे रोजी हा दिवस पाळला जातो. ८ मे, १८३८ रोजी या देशात सर्वप्रथम भारतीय लोकांना येथे आणले गेले. सध्या या देशातील ४४% लोक स्वतःला भारतीय वंशाची म्हणवतात.

मॉरिशस[संपादन | स्रोत संपादित करा]

मॉरिशसमध्ये २ नोव्हेंबर रोजी हा दिवस पाळला जातो.

त्रिनिदाद आणि टॉबेगो[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रिनिदाद आणि टॉबेगोमध्ये ३० मे रोजी हा दिवस पाळला जातो. या दिवशी १८३८मध्ये फतेह अल रझाक या जहाजातून भारतीय लोक येथे सर्वप्रथम पोचले.