Jump to content

बिधन चंद्र रॉय

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट मुख्यमंत्री डॉ. बी.सी. रॉय म्हणून ओळखले जाणारे बिधन चंद्र रॉय (बंगाली: বিধান চন্দ্র রায়, १ जुलै १८८२ - १ जुलै १९६२) हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. बी.सी. रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानीमहात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजकारणामध्ये प्रवेश केला व १९४८ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिरीपदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील १४ वर्षे होते. १९६१ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार देऊन गौरवले. १ जुलै १९६२ रोजी त्यांच्याच जन्मदिवशी रॉय ह्यांचे निधन झाले.

वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी.सी. रोय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१६ सालचा हा पुरस्कार मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.

इ.स. १९७६ सालापासून दिला जात असलेला हा वार्षिक पुरस्कार यापूर्वी भारतातील पहिली cochlear implantची शस्त्रक्रिया करणारे मिलिंद वसंत कीर्तने यांना २०१४ साली मिळाला आहे. त्यानंतर मराठी माणसाला पुरस्कार मिळायची ही दुसरी वेळ आहे.,


साचा:भारतरत्‍न