Jump to content

अमूल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी अमूल ही भारत देशामधील एक प्रमुख दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. १९४६ साली गुजरातच्या आणंद शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली अमूल भारतामध्ये दूध क्रांती घडवून आणण्यासाठी ओळखली जाते. पद्मभूषण त्रिभुवनदास पटेल हे अमूलचे संस्थापक होते. तसेच व्हर्गीज कुरियन ह्यांनी अमूल दूधाला देशभर पोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. आजच्या घडीला ३८,६०० कोटी रूपये इतकी वार्षिक उलाढाल असलेली अमूल ही जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. दूधासोबत ताक, दही, चीज, पनीर, चॉकलेट इत्यादी असंख्य लोकप्रिय उत्पादने अमूलच्या ब्रॅंडखाली विकली जातात.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]