इंदूर संस्थान
Appearance
इंदूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील सेन्ट्रल इंडिया एजन्सी मधील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाला होळकर संस्थान असेही म्हणत. या संस्थानाचे संस्थानिक होळकर घराणे होते.
क्षेत्रफळ[संपादन | स्रोत संपादित करा]
इंदूर संस्थानाचे क्षेत्रफळ २४,६०५ चौरस किमी इतके होते. या संस्थानात सुमारे ३,३६८ गावे होती.
राजधानी[संपादन | स्रोत संपादित करा]
या संस्थानाची राजधानी इंदूर या नगरात होती.
स्थापना[संपादन | स्रोत संपादित करा]
इंदूर संस्थानाची स्थापना सन १७३३ या वर्षी मल्हारराव होळकर यांनी केली.
स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन | स्रोत संपादित करा]
इंदूर संस्थानाचे महाराजा यशवंतराव(द्वितीय) यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर १ जानेवारी १९५० या दिवशी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.