Jump to content

कुडा लेणी

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cave


कुडा लेणी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. तर माणगावच्या आग्नेयस २१ कि.मी. कुडा हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. येथील समुद्रकिनाऱ्याजवळील टेकडीत २६ कोरीव लेण्याचा समूह कोरलेला आहे.(मुरुड-जंजिऱ्यापासून जवळ)

निर्मिती[संपादन | स्रोत संपादित करा]

या लेण्यांची पहिली नोंद इ.स. १८४८ सालची सापडते. लेणीपर्यंत जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते म्हणून खूप वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती. लेणीजवळ मांदाड बंदर आहे. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी सांगितलेले मॅंडागोरा बंदर. मांदाड येथील उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची विटा व खापरे सापडले आहेत.हे सातवाहन साम्राज्यात महाभोजांच्या मांदव घराण्याचे केंद्र होते.

रचना[संपादन | स्रोत संपादित करा]

ही लेणी दोन टप्प्यात कोरलेली आहे. क्र. १ ते १५ खालील स्तरात १६ ते २६ ही लेणी वरील स्तरात आहेत. यात बौद्ध मूर्ती इ.स. ६ शतकामध्ये स्थापिल्या गेल्या आहेत. लेणीतील २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आढळतात.[]

कसे जाल ?[संपादन | स्रोत संपादित करा]

रोहा रेल्वे स्टेशनपासून २४ कि.मी. कुडा गाव आहे. बसने मुरुडपर्यंत जावे तेथून कुडा २४ कि.मी. आहे. 

हेहे पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:महाराष्ट्रातील लेणी साचा:भारतीय बौद्ध लेणी