Jump to content

टेक्सास गायकवाड

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट अभिनेता टेक्सास भाऊसाहेब गायकवाड (जन्म १९४८) हे प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आहेत. आम्ही देशाचे मारेकरी[] हे त्यांचे गाजलेले नाटक. हिंदी व मराठी रंगभूमीवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सुख की दौलत[] हा हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती[].

कार्य[संपादन | स्रोत संपादित करा]

टेक्सास गायकवाड यांनी कार्यकर्ता कलावंत म्हणून दलित रंगभूमी आणि प्रबुद्ध रंगभूमीस भरीव योगदान दिलेले आहे[]. प्रबोधनात्मक नाट्य निर्मिती करून त्यांनी समाजात समता, स्वातंत्र्य व भ्रातृभाव ही संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला..


नाटके[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. ॲट्रॉसिटी
  2. आम्ही देशाचे मारेकरी
  3. जळवा
  4. प्रबुद्ध जलसे (नवा इतिहास)
  5. ब्रह्महत्या
  6. मन्वंतर
  7. मानदंड
  8. माफीनायक
  9. रंग आंधळे
  10. सूर्योदय

दिग्दर्शित नाटके[संपादन | स्रोत संपादित करा]

आखरी जाम (उर्दू), काळोखाच्या गर्भात, घाशीराम कोतवाल (हिंदी), थॅंक्यू मि. ग्लाड (हिंदी), नटसम्राट (मराठी), फेअरवेल टू बॅबिलोन (सहदिग्दर्शन, इंग्लिश- द आफ्रिकन थिएटर ग्रुप सोबत केलेले), मनुकलंक (खैरलांजी हत्याकांडावर आधारित नाट्य.)


साचा:विस्तार