Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
तिमूरशाह दुराणी - मराठीपिडिया Jump to content

तिमूरशाह दुराणी

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
तिमूरशाह दुराणी याचे रेखाचित्र

तिमूरशाह दुराणी (पश्तो: تېمور شاه دراني ;) (इ.स. १७४८ - मे १८, इ.स. १७९३) हा ऑक्टोबर १६, इ.स. १७७२ ते इ.स. १७९३ साली मृत्यू पावेतो राज्यारूढ असलेला दुराणी साम्राज्याचा दुसरा अमीर होता. तो अहमदशाह दुराण्याचा थोरला पुत्र होता. अहमदशाहाच्या मृत्यूनंतर दुराणी साम्राज्याच्या गादीवर बसलेल्या तिमूरशाहास काही पठाण टोळीप्रमुखांचा विरोध होता. या राजकीय विरोधकांचा बिमोड करून दुराणी साम्राज्यावर पकड मिळवण्यातच त्याची बह्वंशी शक्ती व हयात खर्ची पडली. कंदाहारातील पठाण टोळ्यांचा या बंडाळ्यांत हात असल्यामुळे त्याने आपली राजधानी कंदाहारातून काबूल येथे हलवली.

इ.स. १७९३ साली तिमूरशाह मरण पावला. त्यानंतर झमनशाह दुराणी हा तिमूरशाहाचा पाचवा पुत्र साम्राज्याच्या तख्तावर बसला.

संकेतस्थळ[संपादन | स्रोत संपादित करा]