त्रावणकोर संस्थान
त्रावणकोर संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक संस्थान होते.
स्थापना[संपादन | स्रोत संपादित करा]
त्रावणकोर संस्थानची स्थापना इ.स. १७२९ या वर्षी झाली.
राजधानी[संपादन | स्रोत संपादित करा]
त्रावणकोर संस्थानची राजधानी इ.स. १७९५ पर्यंत पद्मनाभपुरम होती, त्यानंतर त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम हीच कायमची राजधानी होती.
संस्थानिक[संपादन | स्रोत संपादित करा]
त्रावणकोर संस्थानचे संस्थानिक वर्मा घराणे होते. प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा हे त्रावणकोरच्या राजघराण्यातीलाच होते.
चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]
त्रावणकोर संस्थानाच्या उत्तरेला आणि पूर्वेला मद्रास प्रांत होता. तर पश्चिमेला अरबी समुद्र, आणि दक्षिणेला हिंदी महासागर होता.
क्षेत्रफळ[संपादन | स्रोत संपादित करा]
त्रावणकोर संस्थानचे क्षेत्रफळ १९,८४४ चौरस किमी इतके होते.
प्रशासकीय विभाजन[संपादन | स्रोत संपादित करा]
त्रावणकोर संस्थानाचे चार विभाग पडले होते-
१. कोट्टायम
२. कोल्लम
३. पद्मनाभपुराम्
४. त्रिवेंद्रम्
भाषा[संपादन | स्रोत संपादित करा]
त्रावणकोर संस्थानात मल्याळम, तमिळ व इंग्रजी या भाषा प्रचलित होत्या.
स्वातंत्र्योत्तर कालखंड[संपादन | स्रोत संपादित करा]
भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा बलराम वर्मा यांनी त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. त्यानंतर त्रावणकोर संस्थान व कोचीन संस्थान यांचे मिळून त्रावणकोर-कोचीन घटक राज्य बनवण्यात आले. त्यानंतर त्रावणकोरचा कन्याकुमारी भाग हा तामिळनाडू राज्यात गेला व उर्वरित भाग हा केरळ राज्यात आहे.