Jump to content

नवबौद्ध चळवळ

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%)

नव-बौद्ध चळवळ (इतर नावे: दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीतून लोकांनी बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्म अंगिकारला होता.[] १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडून जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या लोकांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली, व तेव्हापासून ही धर्मांतराची चळवळ आजही कार्यरत असून त्याद्वारे सर्व स्थरातील लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात.[] या चळवळीने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित केला. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून आलेले आहेत.

बौद्ध धम्माचे भारतात पुनरागमन[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्य

बौद्ध धर्म हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारताचा राजधर्म होता. तो कालांतराने अनेक कारणांमुळे अल्पसंख्याकांच्या धर्मांमध्ये गणला जाऊ लागला. १८९१ साली जेव्हा श्रीलंकेचे बौद्ध नेता व भिक्खू अंगारिक धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली तेव्हापासून भारतात बौद्ध धर्माच्या पुनरागमनास सुरुवात झाली. महाबोधी सोसायटी ही फक्त उच्च जातीय लोकांनाच आपल्याकडे आकर्षित करते.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर