Jump to content

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट व्यक्ती नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर (फेब्रुवारी ५, इ.स. १९३६ - हयात) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे []. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे []. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे - नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.

संकीर्ण माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार