पंढरपूर रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानकपंढरपूर रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका आणि इतर जवळच्या गावांना सेवा देणारे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मध्य झोनमधील सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.[१]
विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र असल्याने हे स्थानक नेहमी व्यस्त असते. पंढरपूरच्या वाऱ्यांसाठीही अनेक विशेष गाड्या सुरू कराव्या लागतात.[२] मुंबई आणि पंढरपूर जोडणारी पंढरपूर- दादर एक्स्प्रेस ही गाडी पर्यटकांची संख्या लक्षात घेऊनच सुरू करण्यात आली होती. इतर अनेक महत्त्वाच्या गाड्यांनी हे स्थानक पंढरपूरला महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांशी जोडते.[३][४]
इमारत[संपादन | स्रोत संपादित करा]
मंदिराच्या शैलीत स्थानकाचे प्रवेशद्वार तयार केले आहे. तसेच स्थानकाच्या समोर एक छोटी बाग आहे. या बागेत ब्रिटिशकालीन रेल्वेचे इंजिन पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवले आहे. हे इंजिन पर्यटकांना नेहमी आकर्षित करते.