ममता चंद्राकर
ममता चंद्राकर या छत्तीसगडच्या पद्मश्री पुरस्कारप्राप्त लोकगायिका आहेत.[१] यांचा जन्म ३ डिसेंबर १९५८ रोजी झाला. त्यांना छत्तीसगडची कोकिळा(नाइटिंगेल) म्हणून संबोधले जाते.[२][३] ममता चंद्राकर यांनी इंदिरा कला संगीत विद्यापीठातून गायनाची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.[४] ममता चंद्राकर यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून गायला सुरुवात केली. १९७७ मध्ये आकाशवाणी केंद्र रायपूरमधून व्यावसायिकपणे लोकगायिका म्हणून काम केले. त्यांच्या कामासाठी २०१६ मध्ये ती पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना इतर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पती प्रेम चंद्राकर हे छत्तीसगडच्या फिल्म इंडस्ट्रीमधील निर्माता आणि दिग्दर्शक आहेत.
प्रारंभिक जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
ममता चंद्राकर यांचा जन्म १९५८ मध्ये श्री डाऊ महासिंग चंद्राकर यांच्या घरी झाला. त्यांना स्वतःला लोकसंगीताचे सखोल ज्ञान होते.[५] ज्या काळात बॉलीवूड संगीताचा स्थानिक लोकसंगीतावर प्रभाव पडत होता, तेव्हा त्यांनी १९७४ मध्ये "सोन्हा-बिहान" नावाची कंपनी सुरू केली. लोकसंगीताचा आत्मा लोकांच्या हृदयात आणि मनात जिवंत ठेवणे हा सोन्हा-बिहान कंपनीचा उद्देश होता. या विचाराने सोन्हा-बिहानने मार्च १९७४ मध्ये चाळीस ते पन्नास हजार लोकांसमोर सादरीकरण केले. दिवंगत दाऊ महा सिंह यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसंगीताच्या प्रसारासाठी समर्पित केले. ममता चंद्राकर यांनी सुरुवातीचे धडे स्वतः वडिलांकडून घेतले. त्यानंतर संगीताच्या पुढील शिक्षणासाठी तिने इंदिरा कला संगीत विद्यापीठात प्रवेश घेतला. १९८६ मध्ये, तिने छत्तीसगढ़ी सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता प्रेम चंद्रकर यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला १९८८ मध्ये एक मुलगी झाली.[३]
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- २०१९ मध्ये छत्तीसगड विभूती अलंकरण [६]
- २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार [७]
- २०१३ मध्ये छत्तीसगड रत्न [८]
- २०२१ मध्ये डाॅ दुलार सिंग मंद्राजी सन्मान
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत पुस्तक
- ↑ ३.० ३.१ साचा:संकेतस्थळ स्रोत चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "veethi" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी