मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ
Appearance
मुंबई (बॉम्बे) उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात. या न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय येथेच दाद मागता येते, तसेच उच्च न्यायालयाने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो.