Jump to content

मॅनफोर्स (निरोध)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट कंपनीमॅनफोर्स कॉन्डोम्स[] (इंग्रजी: Manforce Condoms) हा भारतातील सर्वात मोठा कंडोमचा ब्रँड आहे. याचे उत्पादन मॅनकाइण्ड फार्मा या भारतातील अग्रगण्य वैद्यकीय कंपनीकडून होते. मॅनफोर्स हा देशातील सर्वात जास्त विकला जाणारा कंडोम ब्रँड आहे,[] जो १६ विविध उत्तेजक प्रकारांमध्ये विकला जातो.[][]

मॅनफोर्स कंडोममध्ये टेक्सचर्ड आणि इतर विशेष कंडोमचे प्रकार उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये डॉटेड, रिब्ड, कॉन्टूर्ड, लाँगलास्ट, सुपरथिन, इंटेन्सिटी (मल्टी-टेक्श्चर), स्मूथ (साधा, अतिरिक्त स्नेहवर्धक), अतिरिक्त मोठे, फ्लेर्ड आणि फ्लेवर्ड/सुगंधी कंडोम यांचा समावेश होतो.[][]

निर्मिती आणि प्रकार[संपादन | स्रोत संपादित करा]

हे कंडोम स्ट्रॉबेरी, कॉफी, चॉकलेट, आंबा, काळी द्राक्षे आणि केळी यांसारख्या फ्लेवर्समध्ये येतात.[] ते गुळगुळीत, अति-पातळ, ठिपके, रिबड आणि कॉन्टूर अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. दीर्घकाळ आणि आनंदासाठी, मॅनफोर्सकडे बेंझोकेन क्रीम असलेले एक विशेष कंडोम आहे, ज्याला मॅनफोर्स प्लस कंडोम म्हणून ओळखतात.[]

जाहिराती[संपादन | स्रोत संपादित करा]

मॅनफोर्सच्या जाहिरात मोहीमा त्यांच्या उत्पादनांबद्दल आणि ब्रँडबद्दल खूप चर्चेत असतात. सनी लिओनी या अभिनेत्रीकडूनही जाहिरात केली जाते. सनीच्या जाहिराती विशेष प्रसिद्ध आहेत.[][]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी