मेदू वडा
Appearance
मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे.[१] याला उडीद वडा असेही म्हटले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.[२] दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो.
साहित्य आणि कृती[संपादन | स्रोत संपादित करा]
साहित्य -
- उडीद डाळ
- हिरव्या मिरच्या
- मीठ
- काळी मिरी
- कडीपत्ता
- तळण्यासाठी तेल
- नारळाचे काप [३]
कृती -
- उडीद डाळ प्रथम स्वच्छ धुऊन घ्यावी. ४ ते ५ तास उडीद डाळ पाण्यात भिजत घालावी. डाळ भिजल्यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाकावे आणि केवळ डाळ मिक्सरमधून वाटून घ्यावी.
- वाटलेल्या डाळीत मीठ, कुटलेली मिरी, हिरव्या मिरचीचे तुकडे,आणि असल्यास नारळाचे काप घालावेत.
- कढईत तेल गरम करायला;आहे ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यात वडे सोडावेत. तळहातावर पिठाचा गोल करून त्याला मध्यभागी भोक पाडावे किंवा झाऱ्यावर असा वडा तयार करून घेऊन तो कढईत गरम तेलात सोडावा.
- सोनेरी रंग आल्यावर वडा आतून पूर्ण तळला गेला आहे याची खात्री झाल्यावर वडा तेलातून बाहेर काढावा आणि तेल पूर्ण निथळून घ्यावे.
- नारळाची चटणी आणि सांबार याबरोबर खाण्यासाठी द्यावे. [४]
चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]
-
मेदू वडा आणि चटणी
-
मेदू वडा सांबार
-
भारतीय न्याहरीत मेदू वडा
-
मेदू वडा चटणी
-
दही वडा
-
Uzhunnu Vada (ഉഴുന്ന് വട)