वरळीचा किल्ला
Appearance
वरळी किल्ला हा भारतातील मुंबईतील वरळी येथे ब्रिटीशांनी बांधलेला किल्ला आहे . हा किल्ला १६७५ च्या दरम्यान ब्रिटीशांनी बांधला होता, पण तो बहूधा चुकून पोर्तुगीजांनी बांधल्याचे मानतात. वरळीच्या टेकडीवर बांधलेला हा किल्ला माहीम खाडीकडे लक्ष देण्यासाठी बांधण्यात आला होता. त्यावेळी शहर फक्त सात बेटांनी बनलेले होते. याचा उपयोग शत्रूची जहाजे आणि समुद्री चाच्यां शोधासाठी म्हणून केला जात असे.