Jump to content

शितला देवी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट हिंदू देवता

शितला देवी ही हिंदू धर्मातील एक देवता असून या देवीला आई भगवतीचे रूप म्हणून ओळखले जाते. जवळपास भारतभर या देवीची उपासना करताना दिसून येते.[]

स्कंदपुराणानुसार जेव्हा देवतांनी भगवतीच्या आराधानेसाठी अग्नी प्रज्वलित केला, तेव्हा त्यातून शितला देवी प्रकट झाली. या देवीचे वाहन गाढव असून एका हातात चांदीचा झाडू आणि दुसऱ्या हातात शीतल जल असलेले भांडे दिसून येते. ही देवी विविध प्रकारचे ज्वर, गोवर आणि कांजण्या यांचा नाश करणारी देवता आहे अशी मान्यता आहे.[]

शितला देवीचा मंत्र:- साचा:Cquote

बौद्ध धर्मानुसार, शितला देवी आणि ज्वरासुर नावाचा राक्षस हे पार्णशबरी देवीचे सोबती आहेत. पार्णशबरी ही बौद्ध धर्मातील आजार निर्माण करणारी देवता आहे, आणि तिच्या दोन बाजूला शितला देवी आणि ज्वरासुर नावाचा राक्षस उभे असतात.[]

काही उल्लेखनीय मंदिरे[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जौनपूर उत्तर प्रदेश येथील शितला देवी
    1. *शितला देवी मंदिर, बारड, महाराष्ट्र.
    2. *शितला माता जन्मस्थान मगध, बिहार शरीफ , नालंदा
    3. *शितला माता मंदिर, मैनपुरी , उत्तर प्रदेश
    4. *शितला माता मंदिर, मेरठ , उत्तर प्रदेश
    5. *शितला चौकीया धाम मंदिर, जौनपूर
    6. *शितला माता मंदिर, खंडा, सोनीपत
    7. *मां शितला मकरा धाम, जौनपूर
    8. *श्री शितला माता मंदिर, आदळपुरा, मिर्जापूर , उत्तर प्रदेश
    9. *शितला माता मंदिर, जलोर , राजस्थान
    10. *शितला माता मंदिर, रींगस , राजस्थान
    11. *शितला माता मंदिर, गारिया , कोलकाता
    12. *शितला माता मंदिर, उना, हिमाचल प्रदेश
    13. *शितला माता मंदिर, पालमपूर, हिमाचल प्रदेश
    14. *शितला माता मंदिर, जोधपूर, राजस्थान
    15. *शितला माता मंदिर, कौशांभी, उत्तर प्रदेश
    16. *शितला माता मंदिर, निजामबाद,
    17. *शितला माता मंदिर, बाडमेर, राजस्थान
    18. *शितला माता मंदिर, बिधलन, सोनीपत
    19. *शितला देवी मंदिर, गुडगाव
    20. शितलादेवी मंदिर, केळवे
    21. *शितला देवी मंदिर, माहीम, मुंबई

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. Folk Religion: Change and Continuity Author Harvinder Singh Bhatti Publisher Rawat Publications, 2000 Original from Indiana University Digitized 18 Jun 2009 साचा:ISBN, 9788170336082
  2. साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. साचा:Cite book